सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद ही संस्था मानव परिवर्तन आणि विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही 2008 मध्ये स्थापन झालेली एक अशासकीय संस्था आहे जी प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, रोजगार, कला आणि संस्कृती, कृषी, लिंग, बाल आणि युवा विकास, तंत्रज्ञान, कायदेशीर, माहितीचा अधिकार या क्षेत्रात काम करते.
सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापनेच्या सुरवातीच्या काळात आम्ही गावोगावी जाऊन सर्वेक्षण केले, यामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्या लक्षात आल्या शहरातील किवा ग्रामीण भागात बर्याच प्रमाणात मुलाचे शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे,
शासनाकडून विद्यार्थ्यांना विविध उपाययोजना किवा सरकारी योजना येतात परंतु पालकाच्या शिक्षणाच्या अभावमुळे योजना बद्दल ग्रामस्थना , पालकांना माहिती मिळत नाही.
आम्ही संस्थेच्या मार्फत विद्यार्थीना शिक्षण उपलब्ध करून देतो. त्याच प्रमाणे महिला व मुलींच्या सुरक्षेबद्दल आम्ही त्यांना शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण प्रधान केले, महापुरुषांच्या जयंती व पुण्य तिथि बद्दल जनजागृती केली. मागासलेल्या विद्यार्थ्यांंना विविध कार्यक्रमच्या माध्यमातुन प्रवाहात आणण्याचे कार्य केले.
Post a Comment