महाराष्ट्रचे कुलदैवत छत्रपति शिवाजी शहाजी भोसले महाराज महाराजांचा एतिहासिक वारसा आपल्या महाराष्ट्रला लाभला आहे त्याचा आपल्या सर्वाना अभिमान आहे आज आम्ही संस्थेच्या मार्फत छा.शिवाजी महाराजांची जयंती (शिवजयंती)साजरी केली शिवजयंतीचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ या. सर्वात आगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी केली. या नंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय 'सखाराम गणेश देऊस्कर' (१८६९-१९१२) यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला.बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय 'सखाराम गणेश देऊस्कर' (१८६९-१९१२) यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला.
बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय 'सखाराम गणेश देऊस्कर' (१८६९-१९१२) यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्यास या उत्सवाची बरीच मदत झाली. तसेच महाराष्ट्र आणि बंगाल या दोन राज्यात एकोपा तयार होण्यास बरीच मदत झाली. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली. इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जी परंपरा आजही चालू आहे. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली. महाराष्ट्र मधून सुरू झालेली शिवजयंती ही भरताच्या अन्य राज्यामध्ये तसेच इतर देशांत आज जयंती साजरी केली जाते.
Post a Comment